May 3, 2012

आपलीच मोरी अनं अंघोळीची चोरी





आपलीच मोरी अनं अंघोळीची चोरी.

आपले ठेवायचे झाकून अन दुसऱ्याचे पहायचे वाकून.

आपले ते प्रेम, दुसऱ्याचे ते लफडे.

आपले नाक कापून दुसऱ्याला अपशकुन.

आपले नाही धड नाही शेजाऱ्याचा कढ.

आपले सांभाळावे अन दुसऱ्याला यश द्यावे.

आपलेच दांत अऩ आपलेच ओठ.

आपल्या कानी सात बाळ्या.

आपल्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही पण दुसऱ्याच्या डोळ्यातील कुसळ दिसते.

आपल्या ताटातले गाढव दिसत नाही पण दुसऱ्याच्या ताटातली माशी दिसते.

आपल्या हाताने आपल्याच पायावर दगड.